How to check Gold Purity : सोने प्रत्येक दिवशी किंमतीत नवीन रेकॉर्ड करत आहे. सणासुदीत सोन्याच्या किंमतीत सातत्याने आकाशाला भिडत आहेत. सोन्याने सव्वालाखांचा टप्पा तर कधीचाच ओलांडला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पदरात मोठी निराशा पडली आहे. किंमती वाढत असतानाच सोन्याची शुद्धतेविषयी पण ग्राहकांच्या मनात चिंता आहे. पण आता चिंता करायची गरज नाही. भारतीय मानक ब्युरोने (Bureau of Indian Standards) ग्राहकांच्या शंकेवर एक तोडगा आणला आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला घरबसल्याच सोन्याची शुद्धता पडताळता येईल.
सोनं खरेदी करतानाच तुम्ही किती कॅरेटचे सोनं खरेदी केली याची माहिती असते. सोनं 18 Carat, 22 Carat अथवा 24 Carat आहे की नाही, याची माहिती त्यावर चिन्हांकित असते. त्याआधारे आपण सराफा दुकानदाराला पैसे देतो. यामध्येच फसवणूक होते. दुकानदार 22 कॅरटंच सांगून 18 कॅरटंच सोनं माथी मारतो. दुकानदाराची ही चालाखी तुम्ही पण पकडू शकता.
BIS Care ॲप
सोनार तुम्हाला फसवत असल्याची शंका असल्यास, सोन्याची शुद्धता तपासता येते. तुमच्या त्यासाठी मोबाईलमध्ये BIS Care ॲप डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल. त्यावरून सोन्याची शुद्धता लक्षात येईल.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला सोन्याचे शिक्के, दागिने, आभुषणे, बिस्किट, तुकडा कशाची खरेदी करायची ते अगोदर ठरवा. त्यावरील हॉलमार्क (Hallmark on Gold Jewellery) तपासा. केंद्र सरकारने 1 एप्रिल, 2023 रोजीपासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाच्या हॉलमार्क (Hallmarking Rules) असणे अनिवार्य केले आहे. कोणताही दुकानदार विना 6 क्रमांकाच्या हॉलमार्क शिवाय दागिन्यांची विक्री करु शकत नाही.
सोने किती कॅरेटचे
24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते. यामध्ये इतर कोणत्याच धातूचा समावेश नसतो. हे सोन्याचे सर्वात शुद्ध रुप मानण्यात येते. याचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे या सोन्याची किंमत जास्त असते.
22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. इतर 8.33 टक्के अन्य धातूंचे मिश्रण असते. या धातूंमध्ये प्रामुख्याने चांदी आणि तांब्याचा वापर होतो.
18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के चांदी आणि तांब्याचा वापर करण्यात येतो. 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने हा धातू कठोर होतो.
14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची संख्या अधिक असते. यामध्ये केवळ 58.3 टक्के शुद्ध सोने असते. इतर 41.7 टक्के निकेल, चांदी, जस्त या धातूंचे मिश्रण असते.