8th Pay Commission : 8 लाखांचे एरिअर, बंपर वेतन वाढ! आठव्या वेतन आयोगात अजून काय काय फायदा?

Business

केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांना 8 व्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आहे. सरकारकडून जानेवारी 2025 मध्ये 8 व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) घोषणा करण्यात आली. दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता देण्यात आली आहे. 7th Pay Commission अंतर्गत कर्मचाऱ्यांचा 3 टक्के डीए आणि डीआरमध्ये वाढवण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 55 टक्क्यांहून आता 58 टक्क्यांवर पोहचला आहे. सरकारने 8 वा वेतन आयोग लागू केल्यावर कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठा बदल होईल. आठव्या वेतन आयोगाचे गठण करण्यात आलेले नाही.

जुलै 2027 मध्ये वेतन आयोग लागू होण्याची शक्यता
आयोग गठीत झाल्यानंतर सखोल तपासणीनंतर अहवाल सादर करण्यात येईल. त्याआधारे 3 ते 9 महिने सरकार तपास करेल. 7 वा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये जाहीर झाला. 2015 मध्ये त्याचा अहवाल सादर झाला. जर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापन्याची घोषणा या महिन्यात झाली तर याविषयीचा अहवाल एप्रिल 2027 पूर्वी येणार नाही. जुलै 2027 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतना आयोगाचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख सेवानिवृत्तीधारकांना फायदा होईल. संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांनाही त्याचा लाभ मिळेल.

वेतनात कशी होईल वाढ?
8 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर नुसार पेन्शन आणि वेतन वाढ दिसेल. माजी वित्तीय सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्यानुसार, केंद्राकडून 1.92 ते 2.08 पर्यंत फिटमेंट फॅक्टरला मंजूरी मिळू शकते. तर काही कर्मचारी संघटनांनी 2.86 फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली आहे. त्याआधारे पगारवाढ होईल. ही पगारवाढ बंपर असेल यात शंका नाही.

थकबाकीतूनच कर्मचारी मालामाल
7 व्या वेतन आयोगाची अंतिम मुदत डिसेंबर 2025 मध्ये संपणार आहे. तर 8 व्या वेतन आयोगाची शिफारस जुलै 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. या काळातील म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2027 या 18 महिन्यांतील थकबाकी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.86 टक्के गृहीत धरला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल. तर कर्मचारी थकबाकीतूनच मालामाल होतील. 2.86 फिटमेंट फॅक्टरच्या सहाय्याने चपराशाचा पगार 33,480 रुपयांनी वाढेल. 18 महिन्यांची थकबाकी (33,480×18) 6,02,640 रुपये मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *