आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी ‘होम मिनिस्टर’मधून (Home Minister) संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘भाऊजींनी’ आपल्या लाडक्या वहिनींवर ‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून कायम पैठणींचा वर्षाव केला. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लाडका शो ‘होम मिनिस्टर’साठी आदेश बांदेकर सज्ज झाले आहेत. दरम्यान, ‘होम मिनिस्टर’आधी आदेश बांदेकर यांना झी मराठीच्या ‘गोविंदा आला रे’ (Govinda Ala re) या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून धूरा सांभाळली आहे. या खास कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रोमध्ये निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आदेश बांदेकर यांना राखी बांधत असल्याचं दिसत आहे. भावुक करणारा हा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
झी मराठीवर ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून धूरा आदेश बांदेकर यांनी सांभाळली. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात कलाकारांची विशेष धमाल पाहायला मिळाली. पण या धमाल – मस्तीमध्ये एक भावुक करणारा क्षण घडला. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आदेश बांदेकर यांना राखी बांधली. यावेळी निवेदिता सराफ यांनी, ‘आदेश सगळ्यासाठी भावोजी आहेत. पण माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे’, असं आदेश बांदेकर यांना म्हटलं. सध्या ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
झी मराठीवर होम मिनिस्टर विशेष ‘गोविंदा आला रे’ हा कार्यक्रम 30 ऑगस्ट म्हणजेच रविवारी 6:30 सायंकाळी प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला निवेदिता सराफ स्टेजवर येतात. निवेदिता सराफ हे आदेश बांदेकर यांना ‘तुमच्यासाठी खास कृष्णाईची पूरणपोळी आणली आहे’, असं म्हणतात. त्या आदेश बांदेकर यांना स्वत:च्या हाताने भरवतात. यानंतर आदेश बांदेकर निवेदिता सराफ यांना, ‘हा कृष्णाईचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे’, असं म्हणतात.
आदेश बांदेकर अन् निवेदिता सराफ यांच्यातील भावुक क्षण (Nivedita Saraf Ties Rakhi to Aadesh Bandekar)
यानंतर प्रोमोमध्ये निवेदिता सराफ हे आदेश बांदेकर यांचं औक्षण करतात आणि राखी बांधतात. निवेदिता सराफ हे उपस्थित असलेल्या सर्वांसमोर, ‘खरंतर आदेश बांदेकर सर्वांसाठी भाऊजी आहे. पण माझ्यासाठी माझा भाऊ आहे. आज झी मराठीच्या साक्षीने मला आदेशला बांधायची आहे’, असं म्हणतात. उपस्थित सर्व जण भावुक होतात. आदेश बांदेकरही भावुक झाले असल्याचं पाहायला मिळालं.
औक्षण झाल्यानंतर आदेश भाऊजी, ‘आज तीस वर्षे माझं औक्षण करण्यात आलं. पण कधीच कुठलीच औक्षणाची थाळी झी मराठी आणि आदेशने रिकामी ठेवलेली नाहीये’, असं म्हणतात. यानंतर आदेश बांदेकर हे निवेदिता सराफ यांना पैठणी भेट म्हणून देतात. झी मराठीचा ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकरीही भावुक झाले असल्याचं पाहायला मिळालं. नेटकऱ्यांनी या गोड क्षणाचं कौतुक केलं आहे. तसेच हा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता कमेंटद्वारे दर्शवली.

