महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळला या भयंकर आजाराचा रुग्ण

News Politics

हा व्यक्ती सौदी अरेबियातून भारतामध्ये आला होता, मात्र त्याला अचानक त्रास जाणवू लागल्यानं तो धुळ्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली.

मोठी बातमी समोर येत आहे, धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे. ज्याला मंकीपॉक्स या आजाराजी लागण झाली आहे तो रुग्ण सौदी अरेबियातून दोन ऑक्टोबर रोजी धुळ्यात आला होता. त्वचे संदर्भात त्रास होऊ लागल्यानं तो शहरातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल झाला. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. पुण्याच्या NIA प्रयोगशाळेने या संदर्भातील अहवाल दिला आहे.

हा रुग्ण सौदी अरेबियातून दोन ऑक्टोबर रोजी धुळ्यात आला होता. त्याला त्रास जाणवू लागल्यानं त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, त्यामध्ये त्याला मंकीपॉक्सची लागणं झाल्याचं समोर आलं. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. मंकीपोकॅक्सची लागण झालेल्या या रुग्णावर सध्या धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं ही साधारणपणे फ्लू सारखी असतात. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, थंडी वाजून येणे अशी लक्षणं दिसून येतात. ही फ्लू सारखी लक्षण साधारणपणे तीन ते चार दिवस राहतात, त्यानंतर संपूर्ण शरीराच्या त्वचेवर पुरळ उठतात, आधी अशी पुरळं ही हातावर किंवा पायावर उठू शकतात, त्यानंतर या पुरळाचं रूपांतर फोडांमध्ये होतं. या आजाराची सुरुवात ही आफ्रिकेमध्ये झाली, त्यानंतर तो संपूर्ण जगात पसरला. मात्र जर मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पण झाल्यास घाबरून जाण्याचं कराण नाही, तातडीनं वैद्यकीय उपचार केल्यास हा आजार बरा होता. मात्र या आजाराबाबत अजूनही काही जणांना माहीती नसल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होतं. आजार कोणताही असो, लगेचच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *