देशभरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची उपलब्धता सुलभ होईल
नागपूर, 27 जानेवारी 2026:
भारतामध्ये उच्च शिक्षणापर्यंत पोहोच सुलभ करणाऱ्या कॉलेज ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म ‘अॅप्ली’ ने नागपूरमधील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालय झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (JIT) यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड केले आहे. या भागीदारीमुळे ‘अॅप्ली’ आपल्या राष्ट्रीय विस्ताराला अधिक बळकटी देणार असून, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी JIT मधील अभियांत्रिकी व MBA अभ्यासक्रमांसाठी सहजपणे अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
‘अॅप्ली’ ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी विविध पदवी अभ्यासक्रम व स्पेशलायझेशनची सविस्तर माहिती मिळवू शकतात. पात्रता निकष, फोटो व व्हिडिओ गॅलरी, शुल्क रचना, प्लेसमेंट रेकॉर्ड, माजी विद्यार्थी (अॅलुमनाय) व प्राध्यापकांची माहिती तसेच विद्यार्थी सहाय्य सुविधांसह सर्व आवश्यक माहिती एका ठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे विद्यार्थी व पालक घरबसल्या योग्य व माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.
‘अॅप्ली’ चे संस्थापक व सीईओ नंजुंडा प्रसाद म्हणाले,
“उच्च शिक्षणापर्यंत पोहोच लोकशाहीकृत करणे हा ‘अॅप्ली’ चा सुरुवातीपासूनच उद्देश राहिला आहे, जेणेकरून विद्यार्थी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांशी पारदर्शक, सोप्या आणि परवडणाऱ्या पद्धतीने जोडले जाऊ शकतील. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी सन्मानाची बाब असून या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
दरम्यान, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. नरेंद्र बावणे यांनी सांगितले,
“आम्ही तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक समज यांतील अंतर कमी करत विद्यार्थ्यांना आजच्या गतिमान जगासाठी बहुआयामी व्यावसायिक म्हणून घडवतो. Appli सोबत जोडून आमचा उद्देश आमची पोहोच अधिक व्यापक करणे आणि देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हा आहे.”
About Appli (www.appli.global)
Appli is a platform designed to streamline the university and college application process, making higher education more accessible to students worldwide. By
partnering with leading universities and reputed colleges, Appli helps institutions expand their reach pan-India while offering students a seamless, transparent admissions experience.
About Jhulelal Institute of Technology, Nagpur (www.jitnagpur.edu.in) Jhulelal Institute of Technology is a NAAC A+ rated premier Institute in Nagpur, Maharashtra
with Three B.Tech Programs having NBA accreditation (Computer Science & Engineering, Electrical Engineering and Mechanical Engineering). Its mission is to produce world class engineers with academic and moral excellence who are not only equipped with cutting edge technology skills but also possess immense sense of social responsibility.

